Cotton News : विदर्भातील बुलडाणा (Buldhana) जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.मे महिन्यात ठिबक सिंचन वर लागवड केलेल्या कापूस (Cotton) वेचणीस सप्टेंबर महिन्यातच सुरुवात झाली आहे.
सध्या बुलडाणा जिल्ह्यात कापसाला चांगला दर मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तर दुसरीकडे मजुरांना कापूस वेचणीसाठी प्रति किलो 10 रुपयांची मजुरी मिळत असल्याने शेतमजूर देखील आनंदात असल्याचे चित्र आहे.
Kapus vechani |
कापूस बाजार भाव
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात मे महिन्यात लागवड करण्यात आलेल्या बागायती कापसाला या वर्षी चांगलाच “कापूस बाजार भाव 2022” मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.यावर्षी सुरुवातीलाच कापसाला प्रति क्विंटल 16 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.त्यामुळे शेतकरी समाधीनी आहे.मात्र,हा 16 हजार रुपयांचा दर कायम राहावा अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
Cotton Market Rates
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीला यावर्षीपण कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे.मजुरांना कापूस वेचणीसाठी प्रति किलो 10 रुपयांची मजुरी मिळत असून दिवसभरात एक मजूर साधारण पणे 50 ते 60 किलो कापूस वेचतो.त्यामुळे दिवसाला शेतकऱ्याला 500 ते 600 रुपये मिळतात.त्यामुळे शेतमजुर देखील आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.
ऐनवेळी कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूरांची मोठी चणचण भासत असते.कापूस वेचणीसाठी पडलेला भाव तर आता कायम राहिल पण 16000 रुपयाच्या वर टाकून राहिले पाहिजे.
Cotton Prices in India
देशातील हरियाणा,पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही मंडईंमध्ये कापसाची नवीन आवक सुरू झाली आहे.जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली.यादिवशी कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला.बोदवड येथे कापसाला चक्क 16 हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.तर आज भारतात कापसाला सुरुवातीलाच विक्रमी बाजार भाव मिळाला आहे.