Close Visit Mhshetkari

Cotton Insecticide Spray : कपाशी पिकावर पहिली फवारणी केव्हा व कोणती करावी? पहा सविस्तर माहिती

Cotton spray : मावा आणि तुडतुडे या कीटकांच्या नियंत्रणासाठी तसेच पांढरी मुळीच्या चांगल्या वाढीसाठी आणि कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेतकऱ्यांना पहिली फवारणी करावी लागणार आहे. 

पहिली फवारणी कापूस पीक लागवड केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी .यावेळी कपाशी वर मावा,तुडतुडे,पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव होतो.

कपाशी पहिली फवारणी

कपाशी पिकावर पहिली फवारणी करताना Thiamethoxam आणि Imidacloprid कंटेंट असलेले कोणत्याही कंपनीच्या किटकनाशकांचा वापर करावा.त्याबरोबर टॉनिक किंवा 19:19:19 विद्राव्य रासायनिक खतांचा वापर केल्यास जास्त फायदा होतो.

आज आपण हे कंटेंट असलेल्या किटकनाशकांची व टॉनिक किंवा रासायनिक खतांची पहिल्या फवारणी माहिती पाहणार आहोत.

Cotton First Insecticide Spray

1) ACTARA INSECTICIDE (अक्तारा कीटनाशक)

डोस : 10 ग्रॅम 15 लिटर पंपाच्या पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ACTARA हे Thiamethoxam कंटेंट असलेले कीटकनाशक हे Syngenta कंपनीचे दुसऱ्या पिढीतील निओनिकोटिनॉइड आहे.

एकटारा कीटकनाशक पानाच्या पृष्ठभागावर त्वरीत प्रवेश करते आणि 24 तासांच्या आत कीटक नष्ट करते आणि अवशिष्ट नियंत्रण देखील प्रदान करते.

2) Comfidore Insecticide (कॉन्फिडोर किटकनाशक)

डोस : 10 ग्रॅम 15 लिटर पंपाच्या पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Comfidore Insecticide (कॉन्फिडोर किटकनाशक) Bayer (बायर) कंपनीचे Imidacloprid हे कंटेंट असलेले निओनिकोटिनॉइड कीटकनाशकांच्या रासायनिक वर्गाशी संबंधित आहे.

3) Rogor Insecticide (रोगर किटकनाशक) 

Rogor Insecticide (रोगर किटकनाशक) चा वापर घरात आणि बाहेरील दोन्ही कारणांसाठी केला जाऊ शकतो.कीटक जसे की ऍफिड्स थ्रीप्स माइट्स आणि व्हाईट फ्लाईस आपल्या पिकांचे नुकसान होण्यापासून दूर करण्यासाठी 1-2 मिली लिटर पाण्यात मिसळून संबंधित झाडांवर फवारणी केली जाऊ शकते.या किटकनाशक फवारणीचा कपाशी साठी याचा चांगला रिझल्ट शेतकरी बांधवांना आला आहे. 

रोगर कीटकनाशकाची घटक : डायमेथोएट 30% EC

हे पण पहा --  कापसाचे बाजार यावर्षी का पडले ? Cotton farming

डोस: 1 लिटर पाण्यात 1-2 मिली

कीटकांचे प्रकार : ऍफिड्स, मीली बग्स, हॉपर, जॅसिड, शूट बोरर, स्केल थ्रीप्स.

कपाशीवर पहिली टॉनिक फवारणी

कपाशी पहिली फवारणी करताना किटकनाशक सोबत एक चांगल्या टॉनिक ची सुध्दा फवारणी करावी.यामध्ये आपण विद्राव्य खत किंवा टॉनिकचा वापर करू शकतो. 

(1) BIOVITA (बायोविटा) 

BIOVITA हे उत्तम टॉनिक असून या टॉनिक मध्ये 60 पेक्षा जास्त नैसर्गिकरित्या उद्भवणारे प्रमुख आणि किरकोळ पोषक आणि वनस्पती विकास पदार्थ प्रदान करते ज्यामध्ये एन्झाइम्स, प्रथिने, साइटोकिनिन,अमीनो ऍसिड, जीवनसत्त्वे, गिबेरेलिन, ऑक्सीन्स,बेटेन्स इत्यादींचा समावेश होतो.बायोविटा भाजीपाला फळे आणि शेतातील पिकांमध्ये वापरण्यासाठी सीव्हीड एस्कोफिलम नोडोसमवर आधारित आहे.

डोस : 30 मिली 15 लिटर पंपाच्या पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(2) 19:19:19 रासायनिक खत (विद्राव्य खत)

19:19:19 हे विद्राव्य रासायनिक खत असून यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम पोषक असतात.हे स्टार्टर ग्रेड खत आहे.सर्व 3 प्रकारांमध्ये N चा चांगला स्रोत: अमाइड, अमोनियाकल आणि नायट्रेट या तिन्ही मॅक्रो पोषक तत्वांचा चांगला स्रोत असल्याने,ते पिकाला त्याच्या मुख्य पोषण गरजा पूर्ण करण्यास मदत करते.ह मुळांच्या चांगल्या विकासास आणि शूटच्या वाढीस मदत करते.

डोस : 60 ग्रॅम 15 लिटर पंपाच्या पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Cotton Insecticide Spray

Comfidore + Biovita/19:19:19 किंवा 

Actara + Biovita/19:19:19 

यापैकी कोणतेही कॉंबिनेशन वापरून कपाशीवर पहिला करू शकता.कपाशीवर आपण पहिली फवारणी अतिशय कमी खर्चात करायची आहे.

टिप- वरील उत्पादन वापर करताना आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.कंटेन्ट सारखे असलेल्या कोणत्याही कंपनीचे किटकनाशकांची व टॉनिक ची फवारणी करावी.आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नसून फक्त शेतकरी बांधवांना मदत होण्यासाठी सदरील माहिती दिली आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment