Close Visit Mhshetkari

कपाशी वर पाचवी फवारणी कोणती करावी ? Cotton Insecticide Spray

Insecticide Spray : सध्यस्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झाली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.आता हि कपाशीची पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काय आहे जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

Kapashi Pachavi Favarni
Kapashi Pachavi Favarni

Cotton Insecticide Spray

  कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी करावयाची फवारणी पाहूया,कपाशीचे पातेगळ थांबवण्यासाठी उपाय म्हणून खालील कन्टेन्ट असलेल्या कोणत्याही कंपनीच्या औषधांचा वापर करून कपाशीवर पाचवी फवारणी करायची आहे,जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल.

•• कपाशीवर अमेरिकन बॉण्डअळी (हिरवी बॉण्डअळी),ठिपकेदार बोण्डअळी किंवा गुलाबी बॉण्ड अळी असेल तर खालील कन्टेन्ट असलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी.

Thiodicarb 75 WP किंवा Quinalphos 20 AF 20 (मिली / 10 लिटर)

•• कपाशी 70 ते 95 दिवस झाल्यावर कपाशीवर जर पिठ्या ढेकूण,फुलकिडे,तुडतुडे,पांढरी माशी दिसून आली तर खालील घटक असलेल्या कोणत्याही औषधाची फवारणी करायची आहे.

flonicamid 50 WG (4 gm / 10 लिटर पाणी)

•• कपाशीवर जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आला खालील  कोणतेही एक रसायन असलेले औषधाचा वापरू करु शकता.

Buprofezin 25% SC – 10ml

Diafenthiuron 50% WP-12gm

Spiromesfen 22.9 EC – 12ml

Pyroproxifen 10% EC – 20ml

(दिलेले प्रमाण 10 लिटर पाण्यासाठी आहे.)

Kapus pachavi Favarni

  आता वरिल रासायनिक घटक असलेल्या औषधांची एक चांगली फवारणी कपाशी लागवडीनंतर साधारणपणे 70 ते 95 दिवसांच्या दरम्यान कपाशीवर (Kapus pachavi Favarni) करावी.पांढरी माशी, मावा,तुडतुडे थ्रीप्स यांचा प्रभाव कमी करण्यासाठी किटकनाशक वापरावी.तसेच कपाशीच्या झाडाची वाढ काही दिवस थांबवण्यासाठी,पाते लागण्यासाठी,पते गळ थांबवण्यासाठी एक टॉनिक वापरावे.या बरोबरच एका बुरशी नाटकाचा सामावेश करावा.जसे की –

हे पण पहा --  Kapashi pategal : कपाशीच्या पात्यांचे 100 % बोंडात रुपांतर कसे करावे ? पहा सविस्तर माहिती

• वाढ रोधक संजीवनी – दापोली किंवा चमत्कार किंवा लियोसिन (25 ग्रॅम) 

•• विद्राव्य खत – 13:0:45 किंवा 13:40 :13

•• बुरशीनाशक – साफ/ अवतार (40 ग्रॅम) 

•• सिलिकॉन बेस -स्टिकर्स

•• किटकनाशक – प्रोफेक्स सुपर किंवा रोगर किंवा उलाला

कापूस पाचवी फवारणी

कापूस पाचवी फवारणी किटकनाशक फवारणी करताना किंवा कोणतेही औषधे मिसळवयाची क्रमवारी नेहमी लक्षात ठेवा.किटकनाशके व इतर फवारणी करताना पाण्यात मिसळण्यासाठीची शास्त्रीय क्रमवारी खालील प्रमाणे वापरावीत. त्यांची शॉर्ट फॉर्म,लाँग फॉर्म व उदाहरणे.

1) WSG/WDG  – Water Soluble Granules/Water Disposal granules उदा. थायोमिथॉक्झाम

2) S.P. – Soluble Powders उदा. असिफेट, असिटामाप्रीड

3) WP/WSP – Wetable Powders उदा. मेन्कोझेब, कार्बेडायझीन

4) SL  – Soluble Concentrates उदा. हेग्झाकोनॅझॉल, इंडोग्झीकार्ब

5) EC  –  Emulifiable Conceritrates उदा. क्लोरोपायरिफॉस, क्विनॉलफॉस, फ्रोफेनोफॉस

6) PGR   –    Plant Growth Regulator, Pramoters उदा. ह्युमिक अॅसिड, बायोस्टिमुलंट,नायट्रोबेंझीन

7) WSF – Water Soluble Fertilizers – उदा. १९:१९:१९, युरिया, डी.ए.पी., ई.डी.टी.ए.

Insecticide Spray of Cotton

टीप- सल्फर व कॉपर एकत्र किंवा दुसऱ्या कीटकनाशकांसबोत वापरू नका. इतर सर्वांचा वापर सुद्धा तपासणी केल्यानंतरच फवारणी करावी,द्रावण घट्ट झाल्यास फाटल्यास योग्य मिश्रण न झाल्यास न विरघळल्यास फवारू नका.एखादा घटक अयोग्य असल्याने असे होऊ शकते.वरील क्रमवारीनुसार पाण्यात मिसळणे फायद्याचे ठरते. मात्र, प्रत्येक वेळेस हे सर्वच फवारावे असे नाही. शक्य झाल्यास एका पंपाचे मिश्रण तयार करून ते योग्य सिद्ध झाल्यास २०० लिटर पाण्यात द्रावण तयार करावे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment