Close Visit Mhshetkari

कपाशीला खतांचा पहिला डोस हाच द्या | cotton fertilizer management

cotton fertilizer : मागच्या हंगामात कापसाने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणले, पाच ते सहा हजार प्रति क्विंटल ने विकणारा कापूस चक्क दुप्पट झाला. मागच्या हंगामात कापूस 13 ते 14 हजार रुपयांपर्यंत गेला. पण अतिवृष्टीने शेतकऱ्याला कापसाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही.

Cotton fertilizer management
Cotton fertilizer management

कपाशी खत व्यवस्थापन

यावर्षी कापूस लागवडी क्षेत्रात अंदाजे 5-10% वाढ होण्याची शक्यता आहे. तरी पण कापसाचे भाव चांगल्या दरात स्थिर राहतील.तसेच कापूस उद्योगांकडून या वर्षीही कापसाची अधिक मागणी असणार आहे असा अंदाज आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टी मुळे कापसाचे उत्पादन कमी मिळाले,पण या वर्षी कापसाचे जास्तीत जास्त उत्पादन हाती कसे येईल असा प्रयत्न शेतकरी करत आहे.

कपाशी पीक घेत असताना शेत जमीनीच्या आरोग्याकड आधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठीच सदर लेखामध्ये कापसाचे योग्य कपाशी खत व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत.

कापूस खत नियोजन

कापसाला एकरी 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 50 किलो पालाश शिफारस केली गेलेली आहे. मात्र त्यासोबतच कापूस हे एक तेलवर्गीय पीक असल्यामुळे कापसाला गंधक (sulphur) या दुय्यम अन्नद्रव्याची npk बरोबरच आवश्यकता असते. सतत कापूस आणि सोयाबीन पिके घेतल्या मुळे जमिनीतील गंधक कमी झालेले आहे त्या मुळे रासायनिक गंधक खत देणे आवश्यक आहे.

 वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. BT वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात. द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते.नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम,गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरुप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा.’कापूस खत नियोजन’

लागवडी नंतर खताची पहिली मात्रा

लागवडी नंतर 20 ते 30 दिवसा दरम्यान कापूस पिकाला खताची पहिली मात्र देणे आवश्यक आहे.

 >> एकरी एक बॅग 10:26:26+ 10 किलो गंधक घेऊ शकता

          किंवा

>> एकरी एक बॅग सिंगल सुपर फोस्पेट (दाणेदार) + 25 किलो नत्र + 25 किलो पोटॅश

         किंवा

>> एकरी एक बॅग 20:20:0:13+ 25 किलो पोटॅश

कपाशीसाठी खताची दुसरी मात्रा

लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांच्या दरम्यान डीएपीची एक बॅग + 25 किलो पोटॅश + 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रति एकर

कपाशी पिकासाठी खतांची तिसरी मात्रा

लागवडी नंतर 65 व्या दिवशी एकरी दाणेदार एक बॅग + युरिया 1 बॅग+ मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो

कपाशी पिकासाठी खताची चौथी मात्रा

लागवडीच्या 90 दिवसा नंतर कापसाला नत्राची आवश्यकता असल्यामुळे एकरी एक बॅग युरियाची देणे.

शेती विषयक माहितीसाठी ग्रुप जॉईन करा

कापूस पिकासाठी विद्राव्य खतांच्या मात्रा

ठिबक सिंचनाचा वापर करणा-या शेतक-यांनी पाण्याची आणि खतांची उपयोगिता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचन संचामधून करणे अधिक फायद्याचे ठरते. या तंत्रज्ञानास फर्टिगेशन तंत्रज्ञान असे संबोधले जाते. फर्टिगेशन तंत्रामुळे कापसाचे दर्जेदार गुणवत्तेचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.कापूस पिकासाठी विद्राव्य खतांच्या मात्रा

खते देण्याचा कालावधी – खताचा ग्रेड – खताची एकूण मात्रा (किलो/एकर) – खते देण्याची मात्रा (किलो/एकर/दिवस)

खतांची पहिली मात्रा – लागवडीनंतर ७ ते २२ दिवसात

१२:६१:०० – ८.३३ किलो – ०.५५५ किलो

१९:१९:१९ – २५ किलो – १.६६० किलो

युरिया – १५ किलो – १.००० किलो

खतांची दुसरी मात्रा – लागवडीनंतर २३ ते ६० दिवस

१२:६१:०० – २६.२२ किलो – ०.७०८ किलो

युरिया – ३४.२१ किलो -०.९२४ किलो

पांढरा पोटॅश – १३.१६ किलो – ०.३६१ किलो

खतांची तिसरी मात्रा – लागवडी नंतर ६१ ते १०० दिवस

युरिया- २५.३४ किलो -०.६३३ किलो

पांढरा पोटॅश – १३.३६ किलो – ०.३३४ किलो

खतांची चौथी मात्रा – लागवडीनंतर १०१ ते १२५ दिवस

युरिया – १५.०० किलो – ०.६०० किलो

पांढरा पोटॅश – १६.७० किलो – ०.६६८ किलो

एकाच वेळी जास्त नत्र (जसे युरीया 46 % म्हणजे 100 किलो युरीयामध्ये 46 किलो नत्र किंवा नायट्रोजन किंवा N . प्रमाणाबाहेर!) देण्याचे टाळावे कारण त्यामुळे झाडे हिरवीगार होतात व किडिंचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणूनच नत्राची एकुण मात्रा 3 ते 4 हफ्त्यात विभागुन द्यावी.अधिक उत्पन्न व पिक निरोगी ठेवण्यासाठी बीटी कपाशीला स्फुरद व पालाशयुक्त खत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.”Cotton fertilizer management in marathi

•• बोंडे चांगले पोसण्यासाठी 90 ते 120 दिवसांनी,द्रवखाद 20:20:00 किंवा द्रवपोषक 13:00:45 ई.पाण्यात विरघळणाऱ्या खतांची 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

•• झिंक, मॅग्नेशिअम आणि बोराॅनची कमतरता भरुन काढण्यासाठी कापसावर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

•• मॅग्नेशिअम ची कमतरता असल्यास पेरणीपासुन 45 ते 75 दिवसांनी मॅग्नेशिअम सल्फेट ची फवारणी करावी.

•• झिंक ची कमतरता असल्यास कमतरतेची लक्षणे दिसुन आल्यास 5 ते 6 दिवसांच्या अंतराने झिंक सल्फेट ची फवारणी त्वरित करावी.

•• बोराॅन ची कमतरता असल्यास पेरणीपासुन 60 ते 90 दिवसांनी ( 1 ते 1.5 ग्रम प्रति लीटर पाण्यात) बोराॅनची ची फवारणी दर आठवड्यास करावी.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment