Close Visit Mhshetkari

Cotton farming : खूशखबर…पांढरे सोने वाढण्याचे संकेत!

Cotton farming : कापसाचे बाजार भाव गेल्या दिवसात तुमच्यापासून लपून राहिलेले नाहीत.गेल्या अनेक दिवसांपासून बाजार तेजीत असून आता ते जवळपास स्थिर झाला आहे. पण तुमच्यापैकी अनेक बांधवांना कापसाचे पुढे काय होणार हे जाणून घेण्याची खूप इच्छा असेल.

Cotton crop session

भारतीय कापूस आयातदार  सुतगिरण्या आणि निर्यातदार  यांच्यातील वाद काही संपायचं नाव घेईना.इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंज  अर्थात आयासीएने वेळेत डिलेव्हरी मिळाली नाही म्हणून करार रद्द होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे अशा निर्यातदारांसोबत भविष्यात करार करायचे नाहीत,असं आयातदारांनी ठरवल्याचं सुत्रांनी सांगितलं. तसचं भारतीय आयातदारांनी केलेल्या आरोपांवरूनही आयसीएनं नाराजी व्यक्त केलीये.

कापूस लागवड | kapus lagwad

जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा होता.त्यातच वापर वाढल्यानं दरही वाढले होते. त्यामुळं भारतीय आयातदारांनी १ लाख रुपये प्रतिखंडीनं कापूस आयीतचे करार केले. एक कापूस खंडी ३५६ किलोची असते.तमिळनाडूतील सुतगिरण्यांनी तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे कापूस आयातीचे करार केले आहेत.

हे पण पहा --  कपाशीला खताचा तिसरा डोस केव्हा व कोणता द्यावा ? Cotton fertilizer dose

करार करताना १५ टक्के रक्कम आघाऊ दिली.म्हणजेच ६० कोटी रुपये निर्यातदारांना दिले आहेत.पण कापसाची वेळेत डिलेव्हरी मिळत नाही.मार्च आणि एप्रिल महिन्यात संपलेल्या कराराचा कापूस अद्यापही सुतगिरण्यांना मिळाला नाही.kspus lagead

Cotton farm session

वाणिज्य मंत्रालयानं देशात यंदा जवळपास ४० लाख गाठी कापूस अतिरिक्त असल्याचं म्हटलंय. मागील हंगामातील ७१.८१ लाख गाठी कापूस शिल्लक होता.तर उत्पादन ३१५.४३ लाख गाठी झालं. म्हणजेच केवळ देशातीलच कापूस पुरवठा ३८७.२७ लाख गाठी झाला.

भारताने यंदा ४२ लाख गाठींची निर्यात केली. तर आयात १५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ३२१ लाख गाठी कापूस वापर होईल.त्यानंतरही ३९.२७ लाख गाठी कापूस देशात शिल्लक राहील,असं वाणिज्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

Leave a Comment