Cotton crops : देशात जुलै व या महिन्यातील अतिवृष्टीने कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.गुलाबी बोंड अळीचा शिरकावही कापूस पिकावर दिसत आहे. याच वेळी जगातील सर्वात मोठा निर्यातदार (Cotton Exporter) असलेल्या अमेरिकेतही नैसर्गिक आपत्तीने कापूस पिकाची हानी झाली आहे.या विविध समस्यांमुळे जगभरात कापूस उत्पादनात मोठी घट होईल असे दिसते आहे.
Cotton crops |
जगभरातील कापूस पीक धोक्यात !
जगात सर्वाधिक कापूस लागवड भारतात केली जाते.देशात यंदा लागवड १० टक्क्यांनी वाढून १३५ लाख हेक्टरवर होईल. अमेरिकेत सुमारे ४२ लाख हेक्टरवर, चीनमध्ये ३३ लाख हेक्टरवर, तर पाकिस्तानात २५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यात अमेरिका, चीन व पाकिस्तानसह देशातील उत्तरेकडे कापसाची नव्या हंगामातून आवक सुरू झाली आहे. पाकिस्तानात १२५ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन शक्य आहे.तेथेही कापसाची आयात करावी लागेल. तेथे चीनने गुंतवणूक केल्याने आयात सात ते आठ लाख गाठी एवढी केली जाईल.”जगभरातील कापूस पीक धोक्यात !”
कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
दरवर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक धोक्यात येत असते. त्यामुळं उत्पादनात घट येते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला “कापूस पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव” (Natural Calamity) झाल्याने कापसाची झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत.आता कापसाची उभी झाडे मोठ्या प्रमाणात मरत असल्यानं पिकासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या डोक्यावर बसणार आहेत.यातून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून,खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ,मराठवाडा, खान्देशात सुध्दा महिनाभरापासून अतिवृष्टी मुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसानझाले आहे.अनेक भागांत शेतात तीन-तीन फुट पाणी साचल्याने पिकांवर रोगराई वाढली आहे.कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलाय.सलग तिसऱ्या वर्षी कपाशीचे पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे.
गुलाबी बोंडअळीचा सिरकाव
महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरातेत अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्याने देशातील उत्पादनातही घट येईल. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यातच उत्तरेकडे ५० ते ५५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. तेथे प्रमुख बाजारांत कापूस आवक सुरू आहे. पण पंजाब, हरियाना, राजस्थानात पिकात गुलाबी बोंड अळीचा ((Pink Boll Worm Outbreak On Cotton) शिरकाव झाला आहे. यामुळे नुकसानीची पातळी वाढून उत्पादनाला फटका बसेल, असे सांगण्यात आले.
Global Cotton Production
चीनमध्ये ३५० लाख गाठींचे उत्पादन शक्य आहे.तर अमेरिकेत २२० ते २२५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता.पण, टेक्सास व इतर कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळ, टंचाई, नैसर्गिक समस्या यंदाही आल्या आहेत. अमेरिकेत टेक्सासमध्ये ४० टक्के फटका पिकाला बसला आहे.अमेरिकेत एकूण २० टक्के उत्पादन कमी येईल.मागील हंगामातही टेक्सासमध्ये दुष्काळी स्थिती होती.
अशीच स्थिती तेथे आहे. यामुळे अमेरिकेतील कापूस हंगामाला फटका बसला आहे. तेथून नव्या हंगामातील कापसाची निर्यात सुरू झाली आहे. व्हीएतनामशी अमेरिकेतील निर्यातदारांचे अधिकचे सौदे होत आहेत. पण तेथील उत्पादन १९० लाख गाठी एवढेच राहू शकते.भारतात ४०० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे.(Global Cotton Production)
भारतातील कापूस उत्पादन स्थिती
महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू ही गुजरात व्यतिरिक्त भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्ये आहेत.महाराष्ट्रात कापूस लागवडीखालील क्षेत्र ४ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त आहे. गुजरातमध्ये कापसाची पेरणी २७ दशलक्ष हेक्टरपर्यंत पोहोचू शकते. उत्तर आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये,कापूस लागवडीखालील क्षेत्र अनुक्रमे 1.5 दशलक्ष हेक्टर आणि 4 दशलक्ष हेक्टर आहे.