Close Visit Mhshetkari

Cotton crop session : कापसाला 21 हजार रुपये फक्त 10 किलोसाठी!

Cotton crop session : मित्रांनो सद्यस्थितीमध्ये कापसाच्या बाजार भावा संबंधित सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर खूप साऱ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामध्ये दोन-तीन दिवसापासून कापसाला 21 बाजारभाव मिळाला अशी एक बातमी सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आली परंतु या बातमीची सद्यस्थिती काय आहे याची माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

21 हजार रुपये कापूस बाजार फक्त दहा किलो कापसाला

मित्रांनो कापूस बाजार भाव संबंधी गेवराई तालुक्यामध्ये जो कापसाला 21 हजार रुपये बाजार भाव मिळाला तो फक्त शुभ मुहूर्तावर घेण्यात आलेल्या दहा किलो कापसाचा बाजारभाव होता त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा भ्रमक गोष्टींवरती विश्वास न ठेवता उचलीत होऊ नये आणि सोशल मिळण्यातील जाणकार व्यक्तीने सुद्धा शेतकऱ्यांना असं विचलित करणाऱ्या बातम्या प्रसारित करू नये अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.

Cotton rate
Cotton rate

Cotton crop session

कापसाला 21 हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभावाच्या व्यवहारा संबंधित सविस्तर माहिती तसेच कॉल रेकॉर्ड आणि पावती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे याचा सुद्धा समावेश आपण या लेखांमध्ये केलेला आहे त्यामुळे मित्रांनो शेतकरी बांधवांना विचलित करणाऱ्या अशा बातम्या वरती विश्वास ठेवू नये.अगोदरच पाऊस त्याचबरोबर पावसात पडलेल्या बोंड आळी, पातेगळ आणि बोंडसड यामुळे शेतकरी हवालदार झालेला असताना अशी थट्टा करणे शेतकऱ्यांना शोभणारे नाही तेव्हा सर्व जाणकार मंडळींनी याची काळजी घ्यावी आणि शेतकरी बांधवांना अचूक माहिती आणि शेतकरी विचलित होणार नाही अशा बातम्या आणि माहिती देण्याचा प्रयत्न करावा.

हे पण पहा --  कापसाचे बाजार यावर्षी का पडले ? Cotton farming

कापूस बाजार भाव

तर मित्रांनो यावर्षी कापूस बाजार भाव कसा राहील यासंबंधी जाणकारांच्या मते देशांमधील घटणारे उत्पादन त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या कापसाच्या परिस्थितीची माहिती घेतली असता मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment