Close Visit Mhshetkari

यंदा पण कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता ! Cotton Crop Production

Cotton Crop Production : उत्तर भारतात प्रामुख्याने पंजाब,हरियाणात,राजस्तान या राज्यात कापसाचे (Cotton) पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरातच्या तुलनेत तिकडे लागवड लवकर केली जाते.पण महिनाभरापासून अतिवृष्टी मुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक भागांत शेतात तीन-तीन फुट पाणी साचल्याने पिकांवर रोगराई वाढलीय.कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलाय. या भागात सलग तिसऱ्या वर्षी कपाशीचं पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे.

cotton crop production
cotton crop production

कापूस उत्पादनात घट होणार ?

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ,मराठवाडा, खान्देशात सुध्दा महिनाभरापासून अतिवृष्टी मुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक भागांत शेतात तीन-तीन फुट पाणी साचल्याने पिकांवर रोगराई वाढलीय. कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढलाय. या भागात सलग तिसऱ्या वर्षी कपाशीचं पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे.नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील 62 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 5 लाख 25 हजार 759 शेतकऱ्यांच्या 4 लाख 77 हजार 064 हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर खरीप पिकांचा समावेश आहे.  

हरियाणात सरासरी १८ ते १९ लाख एकरवर कापसाची लागवड होते. सिरसा,फतेहबाद आणि हिस्सार ही जिल्हे कापूस उत्पादनासाठी महत्वाचे आहेत.मात्र या जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला.त्यामुळं शेत शिवारांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे यंदा हरियाणात कापूस उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशातील कापूस लागवड किती वाढली ?

गेल्या वर्षी हंगामात देशातील कापूस (Cotton) पिकावर पाऊस आणि किड-रोगाचा परिणाम झाला होता. त्यामुळे कापूस उत्पादन (Cotton Production) २० टक्क्यांनी कमी राहीलं, तर वापर मात्र ३० टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळं कापसाचे दर (तेजीत होते.

सध्याही कापसाला ९ हजार ते १० हजार रुपयांचा दर मिळतोय. त्यामुळं चालू खरिपात कापसाची लागवड वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता.शेतकरी तुरीसह कमी दर मिळालेल्या कडधान्याचा पेरा कमी करून कापसाला पसंती देत दिली आहे. त्यामुळे कापूस लागवड वाढतेय.देशातील कापूस लागवड cotton crop एक ऑगस्टपर्यंत ६ टक्क्यांनी वाढल्याचं एका अहवालात म्हटलंय.देशात आत्तापर्यंत जवळपास ११८ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली.

Cotton production in India

मागील वर्षी याच काळात ११२ लाख हेक्टर क्षेत्र कापसाखाली होते. महाराष्ट्रात सर्वाधिक ३ लाख हेक्टरनं कापूस लागवड वाढली. त्यानंतर गुजरातमध्ये २ लाख ७२ हजार तर कर्नाटकात दीड लाख हेक्टर क्षेत्र वाढले.मात्र तेलंगणातील कापूस लागवड २ लाख हेक्टरनं कमी झाली. तसेच पंजाब आणि हरियानातही कापूस लागवड घटली. देशात यंदा कापूस लागवड वाढतेय. त्यामुळे ४०० लाख गाठी उत्पादन होईल,असा अंदाज उद्योगातून व्यक्त होतोय.

Cotton market rate

कापूस उत्पादन हे पुढील काळात पाऊस कसा राहतो, कापूस काढणीच्या काळातील वातावरण आणि गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव यावर अवलंबून आहे. सध्याचे कापसाचे वाण हे कीड-रोगांना बळी पडणारे आहे. त्यामुळे यंदाही उत्पादन फार वाढण्याची शक्यता नाही.दुसरीकडे कापूस वापर मात्र वाढलाय. परिणामी यंदाही मागणी आणि पुरवठ्यात जास्त तफावत असण्याची शक्यता नाही.परिणामी कापूस बाजार भाव टाईट राहण्याची शक्यता आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment