Close Visit Mhshetkari

Cotton crop : पाकिस्तान,बांग्लादेश भारतातून कापूस आयात करणार! दसऱ्याला मिळाला एवढा भाव

Cotton crop: जागतिक पातळीवर मागील काही महिन्यांपासून कापड उद्योग अडचणीत होते.महागाई हे त्याचे मूळ कारण होते.मात्र आता भारतासह काही देशांमध्ये परिस्थिती सुधारत असून भारत आणि इतर महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सणासुदीला कापडाची मागणी वाढते.पुढील महिनाभरात जागतिक कापड बाजार सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

पाकिस्तान मधील कापूस परिस्थिती

पाकिस्तानमधील कापूस cotton उत्पादन २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी होईल.त्याचेच प्रतिबिंब सध्या बाजारात जाणवत आहे. मागील दशकातील कापूस उत्पादन कमी राहण्याची ही दुसरी वेळ आहे.पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंतचं सर्वाधिक कापूस उत्पादन सात वर्षांपुर्वी १५० लाख गाठींचे झाले होते. यंदा पाकिस्तानमध्ये लागवडही कमी झाली होती.दरम्यान पाकिस्तानला पावसाने कापूस पिकाला मोठा फटका दिला.

बांग्लादेश मधील कापूस परिस्थिती

बांगलादेशमधील कापड (cotton textiles) उद्योग सध्या कमी मागणीमुळे आडचणीत आला आहे.जागतिक बाजातून कपड्यांना कमी उठाव (demand) मिळत नाही आहे त्यामुळे उद्योगांकडे साठा पडून आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कपड्यांना कमी उठाव आणि मजबूत होणारा डॉलर,यामुळे कापसाचे दर कमी झाले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात (global market)कापसाचे दर एक महिन्यापुर्वी १०५ ते १०६ सेंट प्रतिपाऊंडवर होते.ते आता ८४ ते ८५ सेंटपर्यंत नरमले. परिणामी कापडाचेही दर नरमले.आता या सणासुदीच्या सिझनमध्ये कापडाला उठाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तान आणि बांग्लादेशात निर्यात होणार कापूस !

पाकिस्तान आणि बांगलादेशमधील उद्योगाकडून मागणी वाढल्यास यंदा भारताला जास्त फायदा होईल.भारतातील कापूस उत्पादन (cotton production) उद्योगांच्या मते मागणी यंदा वाढणार आहे.तर शेतकरी उत्पादनात घट आल्याचे सांगतात.उद्योगाच्या अंदाजाप्रमाणे उत्पादन वाढले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील कापूस दर मजबूत स्थितीत राहतील.सध्या कापूस बाजारात चढ-उतार सुरु असले तरी शेतकऱ्यांना सरासरी (Average) ९ हजार रुपये दर मिळू शकतो.

हे पण पहा --  MCX Cotton Live : आस्ट्रेलिया मधून कापूस आयात! कधी वाढेल कापूस बाजार? शेतकरी हतबल

अमेरिका आणि चीन मधील कापूस परिस्थिती

यंदा अमेरिका आणि चिनमध्ये सुध्दा कापूस उत्पादन (cotton crop production)घटले आहे.चीनमध्येही अतिउष्णतेमुळे उत्पादन कमी झाले.त्यामुळे वाढलेली मागणी भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.यंदा या देशात कापूस उत्पादन वाढेल,असे सांगितलं जाते. मात्र शेतकऱ्यांच्या मते उत्पादनात यंदाही घट आहे.(कापूस बाजराभाव )

Cotton crop Maharashtra

काल दसऱ्याच्या (Dussehra Muhurta) मुहूर्तावर अहमदनगर जिल्ह्यातील मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित शेवगाव संस्थेच्या वतीने कापूस खरेदीचा (cotton purchase) शुभारंभ करण्यात आला आहे. कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी उच्च प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल 8111 रुपये भाव जाहीर करण्यात आला.

दरम्यान पणन महासंघाकडून (CCI)यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दर वर्षी पणन कडून ७० केंद्रांवर कापूस खरेदी (cotton) करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी केवळ ५० केंद्रे सुरु करण्याचा ठराव घेण्यात आला आहे.तसे पत्र शासनाला पाठविले असून,शासन काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment