Close Visit Mhshetkari

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनेद्वारे मिळणार 10 लाख… Annasaheb Patil Karj

Annasaheb Patil Loan : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आपल्या महाराष्ट्र राज्यातील  मराठा समाजातील तरुणांना जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात अश्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून त्या तरुणांची स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत असते.

Annasaheb patil karj yojana
Annasaheb patil karj yojana

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

 महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांचा स्वतःच्या नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजना अंतर्गत  कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश्य आहे.आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांपर्यंत आर्थिक सहाय्य्य (financial support) पोहचवून त्यांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम बनविणे.(आण्णासाहेब पाटील कर्ज योजना) योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला १० लाखांपर्यंत कर्ज (loan) उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा जमा करण्यात येते.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती

>> या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

>> केवळ तर ज्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा जातीचे उमेदवार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

>> पुरुषांसाठी जास्तीत जास्त ५० तर महिलांसाठी ५५ वर्षे वायोमर्यादा आहेत.

>> अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.

>> ५ वर्षाकरिता किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल तितक्या वर्षापर्यंत लाभ मिळेल.

>> कर्ज मर्यादा रक्कम १० लक्ष असेल आणि व्याजाचा दर द. सा. द. शे. १२ टक्के एवढा असेल आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपयापर्यंत व्याज रकमेचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात येईल.

>> अर्ज केल्यानंतर ७ दिवसाच्या आत ( सुट्टीचे दिवस वगळून ) लाभार्थ्यास अर्जासंदर्भात प्रतिक्रिया कळविली जाईल.

>> लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केल्यानंतर ६ महिन्यामध्ये त्या व्यवसायाचे दोन फोटो वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे.

हे पण पहा --  Annasaheb patil loan : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून तरुणांना मिळणार 10-15 लाख रुपये कर्ज

>> अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज घेवून व्यवसाय सुरु केला असेल तर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्याने असा बोर्ड लावावा.”आण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती”

Annasaheb Patil Loan Scheme News
Annasaheb Patil Loan Scheme News

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना पात्रता

१. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.

२. लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्ष एवढे असावे.

३. लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

४. दिव्यांगाकरिता, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

५. एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

६. बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे.

७. महामंडळाच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी.

८. लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे

>> आधार कार्ड – ( अर्जदाराचा फोटो व आधार क्रमांक असलेली बाजू अपलोड करणे आवश्यक असेल.)

>> रहिवासी पुरावा – ( खालीलपैकी एक पुरावा जोडलेला असणे आवश्यक असेल) अद्यावत लाईट बील / अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक / अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( ( उपरोक्त पैकी पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा.)

>> उत्पनाचा पुरावा – तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल.’आण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे’

>> जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कसा करायचा:-

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला महास्वयंम वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागतो.

Disclaimer : तुमच्या जबाबदारीवर किंवा योग्य माहिती घेऊन  Instant Loan किंवा personal loan साठी अर्ज करा, आमचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही. आम्ही येथे केवळ शैक्षणिक उद्देशाने माहिती दिली आहे, कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तुमचे कार्ड तपशील, CVV क्रमांक, महिना-वर्ष, वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment