Anant Chaturdashi : देशात सर्वत्र जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने भक्तगण आनंदात आहेत.10 दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात.
10 दिवस सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. यानंतर गणपती बाप्पा आता थेट पुढच्या वर्षी दर्शन देणार या भावनेने भक्त उदास होतात. पण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनंती करत अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर, शुक्रवारी साजरी केली जाणार आहे.मात्र,गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते हे बऱ्याच जणांना माहित नसेल. यामागचे कारण आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया.
anant chaturdashi |
अनंत चतुर्दशी शूभमुहूर्त विधी
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला खूप महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरमधील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 14 व्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. साधारणतः गणेश विसर्जनाचा दिवस म्हणून या सणाची ओळख असली तरी या दिवशी भगवान विष्णू यांच्या स्मरणाचे विशेष महत्त्व आहे.
संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. यावर्षी अनंत चतुर्दशीचा सण 9 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारी आहे. हा दिवस भगवान श्री विष्णूच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. यादिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
अनंत चतुर्दशीचा इतिहास
गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की, ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली, ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी होती. कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग 10 दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले.
10 व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासजींनी थंड पाण्यात डुबकी घेतली. जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते, तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता.
ज्या दिवशी वेद व्यासजींनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. तर तांत्रिक विषयांवर आधारित ग्रंथ, मंत्रमहर्णव आणि मंत्र महोदधी मध्ये सांगितले आहे की गणेशजींची इच्छेनुसार स्थापना करावी आणि 10 दिवस साधना केल्यानंतर त्यांचे विसर्जन करायचे असते.
Importance of Anant Chaturdashi
अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले.या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते.त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला.
श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.
गणपती विसर्जनाचा पूजा विधी
•• सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार पूजा करा. गणपतीला आवडणाऱ्या मोदक, लाडू, मिठाई या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
•• गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी एक वस्त्र घ्या.त्यात मोदक, पैसा, दूर्वा आणि सुपारी बांधून घ्या.
•• ते गणपती मूर्तीसोबत ठेवा. गणपतीची आरती करा.
•• या 10 दिवसांत गणपतीची पूजा करताना आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी.
•• एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा. गणेशोत्सव काळात कळत नकळत झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी. गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.
अनंत चतुर्दशी २०२२ पुजा शूभमुहूर्त
चतुर्शी तिथी : 8 सप्टेंबर 2022, गुरुवार संध्याकाळी 4.30 वाजता
चतुर्दशी तिथी समाप्ती : 9 सप्टेंबर 2022, शुक्रवार दुपारी 1.30 वाजता
गणपती विसर्जन मंत्र
यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।
टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.