Close Visit Mhshetkari

Agriculture News : आता ‘या’ जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांना पण मिळणार 13 हजार ते 36 हजार मदत,पहा शासन निर्णय

Agriculture News : जुन त ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या मात्र,निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षते खालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.तसेच,राज्य आपत्तीप्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येत असते.

   राज्यात जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिदृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत,तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१०.०८.२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून,शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.२५३/म-३, दि.२२.०८.२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर २०२२ या मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

Ativrusti nuskan bharpai yadi

 जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टी,पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये काही जिल्हे बसत नव्हते पण बसत या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद,अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते.या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आणि या निर्णयाचा सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

हे पण पहा --  Pik vima list : पीक विमा जमा झाला नसेल, तर लगेच करा काम तरच मिळेल विमा
अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा

आतापर्यंत सुमारे 3 हजार 900 कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे.काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. यापुर्वी 30 लाख आणि आता या मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या 755 कोटीच्या निधीमुळे अंदाजे 36 लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Crop insurance

यापुर्वीच शासन निर्णय दि.11/8/2022  अन्वये राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.आता खालील प्रमाणे वाढीव दराने अतिवृष्टी नुकसान भरपाई (Crop insurance 2022) मिळणार आहे.

  •  जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये.
  • बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरुन 27 हजार रुपये.
  • बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये.
  • एकूण क्षेत्र : 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र
  • एकूण निधी : सुमारे 755 कोटी रुपये

‘या’निर्णयाचा खालील जिल्ह्यांना मिळणार लाभ

औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली, बीड,लातूर,उस्मानाबाद या जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 489 हेक्टर क्षेत्र,यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711.31 हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील 74 हजार 446 हेक्टर असे एकूण 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय येथील येथे पहा ⇓

शासन निर्णय (28/9/2022 GR) 

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment