Close Visit Mhshetkari

Agneepath Yojana भारतीय सैन्यदलात करा 4 वर्षे नोकरी बघा पगार,फायदे

Agneepath Yojana : भारतातील तरुणांना आता चार वर्षांसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची ‘अग्निपथ योजना’ जाहीर केली.

योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना ‘अग्निवीर’ म्हटलं जाणार आहे.भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अग्निपथ योजनेची घोषणा केली.या योजनेबाबत सविस्तर माहितीही दिली.

Agneepath scheme
Agneepath scheme

What is Agneepath Scheme?

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह अग्निपथ योजनेचा शुभारंभ केला. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गंत तरुणांना अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात येत आहे.

भारतीय सैन्यात भरतीसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. केंद्र सरकारने आजपासून सुरू केली आहे.यामुळे तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती नव्या योजनेचा शुभारंभ करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अग्निपथ योजनेची घोषणा केली.तसंच,या योजनेबाबत सविस्तर माहितीही दिली.

अग्निपथ भारत योजना

या अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या ‘अग्निवीरांना’ संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत.’अग्निपथ भारत योजना’अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य, अनुभव यांमुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्य संधी मिळतील,असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

हे पण पहा --  Indian Air Force Recruitment : भारतीय हवाई दलात भरती 12 पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी; लगेच करा अर्ज..

अग्निपथ योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि सैन्यातील कौशल्य,अनुभव यांमुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्य संधी मिळतील,असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

तसंच,”आपल्या अर्थव्यवस्थेला उच्च कौशल्याच्या मनुष्यबळही उपलब्ध होईल.परिणामी उत्पादकता वाढेल आणि GDP वाढण्यासही मदत होईल,”असे राजनाथ सिंह म्हणाले.

Agneepath Recruitment Scheme

अग्निपथ योजनेबद्दल 7 मुद्द्यांमधून जाणून घेऊया या

1) अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. चार वर्षांसाठी काम सेवा करणाऱ्या या सैनिकांना ‘अग्निवीर’ म्हटलं जाईल.

2) चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 % तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल.

3) पुढच्या 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती सुरू होईल.

4) वय वर्षे 21 दरम्यानच्या तरुणांना या अग्निपथ योजनेचा लाभ घेऊन सैन्यात चार वर्षांसाठी भरती होता येईल.

5) या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी महिन्याकाठी 30 हजार रुपये, तर चौथ्या वर्षी यात वाढ होऊन 40 हजार रुपये वेतन मिळेल.

6) या योजनेअंतर्गत काम करत असताना जर अग्निवीराने सर्वोच्च बलिदान दिले,तर विम्याची मदत दिली जाईल,तसेच कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी त्यांना दिला जाईल.

7) राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशासाठी या योजनेचा फायदा होईल,अशी आशा व्यक्त केली गेलीय. तसेच, यातून शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास, मानसिक विकास, टीम बिल्डिंग आणि डिसिप्लिन अशा विविध गोष्टी अग्निवीरांना या चार वर्षात आत्मसात करता येतील,असेही सैन्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment