Close Visit Mhshetkari

8th pay commission : आठवा वेतन आयोग कधी लागणार! पहा किती वाढेल पगार ?

8th Pay Commission : सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली असताना आता 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चांना उधाण आले आहे.आठव्या वेतन आयोगाची मागणी आता जोर धरू लागली आहे. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर आठवा वेतन आयोग लागू केव्हा होईल आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल ?

8th Pay Commission News

 सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या महागाई भत्याची चर्चा रंगली आहे. पण आता 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चांना उधाण आले आहे. गंमत म्हणजे सध्याच्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 38 टक्के वाढण्याची  आवश्यकता असून तशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.येत्या तीन चार दिवसांत याविषयीची निकाल लागेल.

8 वा वेतन आयोगाला मुहुर्त कधी ? 
आठव्या वेतन आयोगाला  मुहुर्त कधी लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण करुयात. विविध तज्ज्ञ त्यांचे तर्क लढवत आहेत.पण 2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत त्यावेळी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करु शकते.

8th Pay Commission latest news

हे पण पहा --  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठवा वेतन आयोगसंदर्भात हालचाली

निवडणुकांमध्ये आठवा वेतन आयोग घोषित करुन पुढील दोन वर्षांत या विषयीची अंमलबजावणीचा प्रयत्न सरकार करेल असाही दुसरा मतप्रवाह आहे. सध्याचे वातावरण पाहता सरकार कर्मचारी संघटनाचा नाहक रोष ओढावून घेण्याच्या मनस्थितीत नसणार हे निश्चित आहे.त्यामुळे निवडणुकांच्या जवळपास ही घोषणा होऊ शकते.

8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ?

 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आलाआला होता. म्हणजे 1 मार्च 2016 रोजी असलेल्या मुळ पगाराला 2.57 गुणले आणि वेतन आणि त्याआधारे त्याआधारे सातवा वेतन आयोग लागू करुन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली.सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता.

 केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना महागाई भत्ता, प्रवास भत्ता,घरभाडे या भत्त्याचा विचार न करता फक्त मुळ वेतनावर  सातव्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टर 2.57 ने गुणाकार काढून काढला जातो.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment