Close Visit Mhshetkari

7th pay commission : सातवा वेतन आयोगाचे हप्ते,DA Arrears व वेतन निधींचे वितरण करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय

7th pay commission : महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडुन अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त अनुदान निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे.

घरबांधणी अग्रिम 2023

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाागाडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यात येईल.मुंबई वित्तीय अधिनियम,1959 मधील परिशिष्ट 26 नुसार अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात येणार आहे.

Government employees

दिनांक 01/05/2001 रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या (दुसऱ्या वेळेस जुळया अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

ज्या उद्देशासाठी निधी / अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.तसेच इतर लेखाशिर्षाकडे वळती करता येणार नाही.

हे पण पहा --  Employee DA Hike : खुशखबर...'या' दिवशी होऊ शकते DA वाढवण्याची घोषणा

Government employees salary updates

जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरीत करता येणार नाही. डिसेंबर 2022 हिवाळी अधिवेशनात सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकीसाठी पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे.

7th pay commission Arrears

सद्यास्थितीत सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या थकित हप्त्या मंजूर पुरवणी मागणीच्या 50% इतकी तरतूद या आदेशान्वये वितरीत करण्यात येणार आहे.

सदर तरतूद केवळ सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याच्या थकबाकीसाठीच खर्च करण्यात येणार असून अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी सदर तरतूदीचा वापर करता येणार नाही.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment