Close Visit Mhshetkari

7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोग व महागाई भत्त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! फाईल..

7th pay commission : माहे जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्तामध्ये 4 % वाढ निश्चित केली गेली आहे. या वाढीमुळे,डीए/डीआर दर 46 टक्क्यांवर जाईल.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 46 % डीए/डीआर वाढीच्या फाइलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार आहे.

AICPI-IW निर्देशांकात 1.7 अंकांची वाढ!

भारत सरकारच्या कामगार ब्युरोने जून 2023 साठी जारी केलेल्या ‘अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक’ मध्ये 1.7 गुणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आता हा निर्देशांक 136.4 झाला आहे.

जून 2023 साठी अखिल भारतीय AICPI-IW निर्देशांक 1.7 अंकांनी वाढला आहे. 136.4 ची ही वाढ मागील महिन्याच्या तुलनेत 1.26 टक्के अधिक आहे,एका वर्षापूर्वी याच महिन्यात 0.16 टक्के वाढ, नोंदवली गेली होती.

‘ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर’ निर्देशांक महिन्याला तयार केला जातो. यासाठी देशातील 88 महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांतर्गत, 317 बाजारपेठांमधून डेटा गोळा केला जातो.सध्याच्या निर्देशांकावर जास्तीत जास्त, दबाव खाद्य आणि पेये गटातून आला आहे. या दोन गटांनी एकूण बदलामध्ये 1.62 टक्के वाढ झाली आहे.

हे पण पहा --  7th pay commission : मोठी बातमी....नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता!

घरभाडे भत्ता वाढ होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांनंतर, डीए-डीआर मध्ये 8 टक्के वाढ मिळण्याची अपेक्षा आहे. 1 जुलैपासून भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये डीएमध्ये पुन्हा 4% वाढ शक्य आहे.,म्हणजे सहा महिन्यांनंतर कर्मचारी व पेन्शनधारकांचा डीए/डीआर 8 % नी वाढण्याची शक्यता आहे.

सन 2026 मध्ये पगाराची पुनर्निश्चिती होईल का?

सातवा वेतन आयोग 2013 मध्ये स्थापन करण्यात आला होता. तीन वर्षांनी आयोगाच्या शिफारशी लागू झाली होती. त्यानुसार 2026 मध्ये पगारात सुधारणा करावी लागणार आहे.त्यासाठी 2023 मध्ये आयोगाची स्थापना करणे ,आवश्यक आहे.

आता केंद्र सरकार असा, कोणताही आयोग स्थापन करण्यास नकार देत आहे. संसदेत महागाई भत्ता व नवीन वेतन आयोग संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये ,जानेवारी 2016 ते जानेवारी 2023 दरम्यान जवानांच्या पगार आणि पेन्शनमध्ये 42 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत देशातील दरडोई उत्पन्नात 111 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment