7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.ताज्या माहितीनुसार राज्यातील शिक्षण सेवक,ग्रामसेवक आणि कृषी सेवक यांच्या मानधनामध्ये राज्य शासन मोठी वाढ करणार असून जुन्या पेन्शन संदर्भात सुध्दा मोठी अपडेट आली आहे.
7th Pay commission update |
old pension scheme
राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी व परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधनात वाढ आणि जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा प्रश्न डॉ. सुधीर तांबे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना / NPS योजना लागू करण्यात आली आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल असल्याने याबाबत न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
7th pay commission updates
विधानसभेत ग्रामसेवक, शिक्षण सेवक आणि कृषी सेवक यांना परिविक्षाधीन कालावधीत मिळणाऱ्या मानधनाबाबत DA Update प्रश्न उपस्थित केला असता राज्य शासनाच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, राज्यातील तमाम परिवेक्षाधीन कालावधीत सेवा बजावणाऱ्या शिक्षण सेवक कृषी सेवक आणि ग्रामसेवक यांना दरमहा सहा हजार रुपये एवढा पगार (Salary) दिला जातो.
आता सहा हजार रुपयात या महागाईच्या काळात उदरनिर्वाह भागवणे मोठे कठीण असल्याचे कर्मचारी वारंवार नमूद करतात. यासंदर्भात कर्मचाऱ्यांकडून उच्च न्यायालयात दाद मागितली गेली होती.यासाठी सदर कर्मचाऱ्यांकडून (Employee) उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.यावर उच्च न्यायालयाने सर्व पक्षांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर राज्य शासनात परिवेक्षाधीन कालावधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
Salary Hike Update
राज्यातील शिक्षण सेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून याबाबत राज्य शासनामार्फत उच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल,असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
शिक्षण सेवक मानधन वाढणार!
राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी व परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न डॉ. सुधीर तांबे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांनी ही माहिती दिली.दीपक केसरकर यांच्या परिविक्षाधीन कालावधीत काम करणाऱ्या सदर कर्मचाऱ्यांना दरमहा 15,000 ते 20,000 रुपये पगार