Close Visit Mhshetkari

Kendrapramuk Bharati : मोठी बातमी…केंद्र प्रमुख भरती निघाली! पहा पात्रता,निकष परिक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

Kendrapramuk Bharati : महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद (Kendrapramuk Bharati) निश्चित करण्याबाबतचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.

Cluster Head Exam 

शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०१० अन्वये केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४०:३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि. १०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले.येथील शासन निर्णयान्वये सदर पदे भरणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली.

सदर कार्यपध्दतीनुसार पदे भरली जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.त्यामुळे १०० टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे..”Cluster Head Exam 2022″

हे पण पहा --  Cluster Head : केंद्रप्रमुखांची रिक्त पदेलवकरच भरणार,पहा पात्रता,निकष परिक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम

केंद्र प्रमुख भरती 2022 शासन परिपत्रक येथे पहा

शासन परिपत्रक

केंद्र प्रमुख भरती 2022

केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता देण्यात आल्या आहेत.

Kendrapramuk Bharati

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करातील.केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

Leave a Comment