7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे.आपल्याला माहिती असेल नुकतंच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 % ची वाढ केली होती.
आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे,तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर.
7th Pay Commission DA Hike
महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही पण हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.दिनांक 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. सदरील अधिवेशन एक आठवडाभर राहील, दरम्यान या अधिवेशनात शेतकरी, सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे.
साधारणपणे पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा 53% डीएवाढीबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव सभागृहामध्ये ठेवला जाईल आणि याच प्रस्तावाला फडणवीस सरकार मान्यता देईल असे बोलले जात आहे. ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे.
अर्थातच हिवाळी अधिवेशनात याबाबतचा निर्णय होऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबतच महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे.
उदाहरणार्थ – जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 42300 रुपये आहे तर 50 % महागाई भत्त्यानुसार 21150 रुपये मिळत आहे.आता 53 % डीए वाढीमुळे महागाई भत्ता 22419 रुपये होईल म्हणजेच पगारात दरमहा थेट 1269 रुपयांनी वाढ होणार आहे.
सदरील वाढ 1 जुलै 2024 पासून लागू झाली असल्याने 6 महिन्याचा फरक 7614 रुपये मिळणार आहे.